Friday 12 February 2010

अम्बरनाथ शिव मंदिर

अम्बरनाथ शिव मंदिर 
अम्बरनाथ पासून २ किमी अंतरावर वसलेल 
पुरातन शिव मंदिर मुंबई पासून तास दीड तासाच्या अंतरावर 
शिलाहार राजाने याचे बांधकाम केले हेमाड पंथी बांधकाम आहे .
काल्या दगडात कोरीव काम केलेल असे हे अत्यंत सुंदर मंदिर 
पंडवानी देखिल हे मंदिर बांधल जेव्हा ते अद्न्यात वासात होते एका दगडात कोरीव बांधकाम एका रात्रीत केल अशी वंदता आहे
मंदिरात गाभार्यात जाण्यासाठी विस पायर्या आहेत 
दर महाशिव रात्रीला येथे मोठा उस्सव भरतो
shiv mandir
Jan 1, 2010
by sunil
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu65&target=ALBUM&id=5434788229668519457&authkey=Gv1sRgCJfhp_m0rPW5dA&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.
shiv mandir
Jan 1, 2010
by sunil
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu65&target=ALBUM&id=5434788229668519457&authkey=Gv1sRgCJfhp_m0rPW5dA&feat=email
To share your photos or receive notification when your friends share photos, get your own free Picasa Web Albums account.

Friday 22 January 2010

मलंग गड ,,,


मलंग गड ,,,

बाबा आपण पाकिस्तानात तर नाही ना आलो ?मलंग गडाच्या पायथ्याशी आलो आणि ह्या चिमुरड्याने
आपल्या वडीलांना वरील प्रश्न विचारला ,
आणि मी डोळे उघडून तो गड न्याहालू लागलो 
मुसलमानांचा जागता पहरा आहें की काय इतके तेइथे संख्येने जास्त आहेत
{मलंगनाथ} ,, हाजी मलंग च्या नावाने उर्स  भरवतात.आपली दुकान सजवातात हिरवे झेंडे फडकवतात   वास्तविक  श्री मलंग नाथ समाधीची व्यवस्था आणि त्याचे विश्वस्त मंडळ त्याचे अध्यक्षपद  आज ही परम्परे नुसार  "श्री माधव  केतकर "यांच्या कडेच आहे पायथ्या पासून  समाधी स्थला  पर्यंत साधारण २ तास लागतात त्यात ५\५० दर्गे आहेत    आपली ही देवळ आहेत पण दुर्लक्षित उपेक्षित,,,त्यांच्या ना दिवा बत्तिची सोय ना तेथील कर्मचार्यांची काही       सोय,,या उलट दर्ग्यांमध्ये शाही रहायची व्यवस्था .भाविक ही मग याच दर्ग्यांच्या आणि त्यांच्या होटेलचा आसरा घेतात  .
खर तर "श्री मलंग नाथ "हे नाथ पंथीय साधू या गडावर रहवायास आले,"गुरु मचिन्द्र नाथांच्या " आशिर्वादाने त्यानी
आज ही आपण ज्या तथाकथित "हाजी मलंगाच्या"पाया पडतो  

तो कुणी हाजी नाही
हाजी म्हणजे हज ला जावून आलेला पण,,, 
हिंदूंच्या अनेको अक्षम्य चुकांपैकी  ही एक "ठ ळ क चुक ,,
पूर्वी कधीतरी कुणी हाजी येथे येवून राहिला आणि,,,  
मुसलमानांनी त्याला अत्यंत खुबीने 
"श्री मलंग नाथांना" हाजी मलंग केला .
समधिचा स्थालाचा  दर्गा केला
त्या समाधी स्थलाच्या कळसावर   माशाच चिन्ह आहें 
कारण मलंग नाथांचे गुरु श्री मछिन्द्र नाथ यांचा जन्म माशाच्या
पोटात झाला त्याचे प्रतिक म्हणून आजही त्या दर्ग्याच्या कळसावर "माशाचे चिन्ह"आहें.
खाली वाघेश्वरी देवी आहें तीची पालखी उठ्वाल्याशिवाय मलंग नाथांची पालखी उठवत नाहीत .मध्यंतरीच्या कालात स्वर्गीय श्री आनंद दिघे यानी मलंग मुक्तीची हाक  हिन्दू भाविकाना दिली त्याला जोरदार प्रतिसाद देखिल मिळाला परन्तु आज ती ताकद तो करिश्मा दुसर्या कुणा नेत्यात  नाही  आणि आम्ही हिन्दू ,,,?
मुलखाचे आळशी आम्हाला कुणी तरी तारणहार लागतो 
"संभवामि युगे युगे चा" मंत्रा जपतो आणि त्यातच धन्यता मानतो
गडावर पाच पीर ,सात टाकी,देवनी सुळक्यावर शंकराची पीतली पिंड आहें,
वरील टाक्यातिल पाणीखलील गावात जाते. देवनी  सुळक्यावर दोराच्या च्या सहयाने  जाव लागतेकल्याण पासून जान्या येण्या साठी सारख्या बसेस आहेत
कल्याण पासून हाकेच्या अंतरावर आहें पण आमच लक्ष नाहीमलंग मुक्तीची वाट ही आमची वहिवाट ठरेल तो सुदिन....
येथे   वास्तव्य केले
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu65&target=ALBUM&id=5429608786171864753&authkey=Gv1sRgCKK87tzGkY-t5QE&feat=ईमेल
यूटूब वर याचा वीडियो देखिल पाहू शकता सोबत लिंक पेस्ट करत आहें 

Thursday 7 January 2010

कोकण कडा( हरिशचंद्र गड) नलीची वाट मार्गे

अनादी मी अनंत मी अवध्य मी ,
मज मारील रिपु कवण जन्माला "
असे सांगणारे गड कोट म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच,,,
दिनाक १.१.१० व्ही रेंजेर सोबत नलीची वाट ,,,
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी ४\५ वाटा आहेत .
साधले घट,पाचनाइ,खिरेश्वर,बेलपाडा ,कोतुल,आणि नलीची वाट ,,,,,,
ऊँची १४२४मीटर , म्हणजे ४६७१ फुट उंच .हा गड पहायचा म्हणजे कमीत कमी २ दिवस हवेत. दुरून डोंगर साजरे म्हणजे काय ते,,
नलीच्या वाटेने गेल्याशिवाय नाही समजत. 

पुणे, नगर आणि ठाणे 
 यांच्या सिमारेषेवर हा गड आहें हरिशचंद्र गड,,,,आणि त्याचा बेलाग 
कोकणकडा ,,
सह्यपर्वताच्या ज्या डोंगराळ भागात हरिशचंद्र वसलेला आहें.तो भाग डांग य नावाने ओळखला  जातो .इथल्या
डोंगराचे वैशिष्ठ्य म्हणजे याची घाटाकडे  असलेली पश्चिम बाजु सरळ सोट उंच आहे 
हरिश्चान्द्राला लागुन असलेला नकटा  , घोड़ीशेप,आजोबा , रतन गड ,  ते अगदी कुलंग पर्यंत बहुतेक सर्व ड़ोंगराना
पश्चिम बाजुस अंगावर येतील असे भीती दायक कड़े लाभले आहेत .
शुक्रवारी आम्ही निघालो कारण निसर्गवेडयानची पंढरी आम्हाला साद 
घालत होती कोकण कडा त्याची अजस्त्र आंतरवक्र  भिंत .
आम्ही चढ़नार होतो नलीची वाट,,वाट कसली आम्ही घातला होता जोखिमिचा घाट,,,रात्रि बेलपाड्यात मुक्काम केला.सकाळी ७.१५ ला 
चालायला सुरवात केली आणि संध्याकाळी 
आम्ही ५ वाजता गडावर पोहचलो तब्बल १० तास ,,,काय चेष्टा आहें राव?कुठेही पाण्याची सोय नाही मोठ मोठाले दगड आणि प्रचंड घसरा ,,
आणि कोकण कडयाच्या दोन अजस्त्र भींतितून चिंचोल्या मार्गाने गेलेली वाट
नलीची वाट,
झाड़ी नाही सावलीही नाही आणि आम्ही चालतोय,,, 
समोर कोकण कडा दिसतोय वाटतय हे आत्ता पोहाचु वर पण कसल काय आम्ही चालतोचालतोय आणि एकदाचे कड्यावर पोहचलो.नवख्या माणसाला सुरवातीला या कड्याच्या मध्यावारून  खाली नजर फिरवण्याचे धैर्य होत   नाही       कड्यावरून आपटून वर येणार्या  भन्नाट  वार्यामुले हलकी वस्तु खाली टाकल्यास. लगेचच ती वर येते. जवळ जवळ अर्धा किलोमीटर परीघाचा  अर्धवर्तुलाकृति आंतरवक्र असा हा कडा अवघ्या सह्याद्रित अजोड आहें 
वर पोहचलो कड्यावरून नजर खाली पहायचा मोहा मी आवरु शकलो नाहीसमोर दिसणारी भीषण दरी बेलाग कड़े,सह्या पर्वत रांगा आणि अफाट पसरलेला  कोकण कडा ,,        
 कड्यावर निजुनच आम्ही त्याच्या उंचीचा अंदाज घेतला आणि काय सांगू? माझ्या  वारकर्याच्या  भाषेत सांगायचे झाले तर,, 
जो आनंद आम्हाला पंढरपुरात  गेल्यावर होतो ,,
तोच आनंद मला कोकण कड्यावर पोहचल्यावर झाला     
वर तारामती शिखाराच्या पोटाशी नऊ लेणी आहेत
पुरुष भर उंचीची गणेशाची मूर्ति देखिल आहें.
हरिशचंद्रा पासून खाली गेले की केदारेश्वरचे गुहेत पुरुष भर  उंचीचे अप्रतिम शिव लिंग आहें .पिंडी भोवती कमरे इतक पाणी आहें . हे पाणी इतके थंड आहें की त्यात हात ही घालू शकत नाही पण,,
 आम्ही आंघोळ केली आणि त्या थंड पाण्याचा मनमुराद आनंद लुटला. 
 अवघड वाटा,जंगल, कड़े कपारी, पायाखाली तुडवित असताना मनात      मात्र असंख्य विचार येत होते आज  आमच्याकडे असंख्य सोयी सुविधा आहेत तरीही हे रस्ते ओलांडतानाते किती खडतर आहेत 
याचा  पावलो पावली अनुभव येत होता .आजुबाजुला  राहणारे आणि आमच्या सारखेच ,,
केवळ येवू शकतात.
इतरांसाठी,,?त्यानी विचारही करू नये.
मग सहजच प्रश्न पडला तो असा,
या  महाराष्ट्रावर पर्कियानी कसे काय राज्य केले?
इथल्या  जंगलात ते हरवले कसे नाहीत ?
इथले दगड धोंडे त्याना कधीच आडवे गेले नाहीत काय? कड़े  कपार्यात पडून त्यांचा कपाळमोक्ष कसा नाही झाला ?
इथे  गवताला ही भाले फुटतात मग ते परकीयांना कसे काय वश झाले? 
लेखन्या मोड़ा आणि बंदुका हाती घ्या असे संगनारे इथे जन्मले तरी हा देश पारतंत्र्यात कसा गेला?
राकट देशा कणखर देशा दगडां च्याही  देशा ,,,म्हननारे?
छात्रपतिंचे मावले  सारे सारे हे कुठे गेले होते ?की परकियानी येथे  
वारन्वार आक्रमने करून  आमच्यावर राज्य केले.
आमच्या आया बहिणींना देशोधडीला लावले.आणि अखंड हिन्दुस्थान द्विखंड करून त्याला पुरते नागवुन इथून चालते झाले.
आणि आम्ही हे सार वाचवायच सोडून आम्ही आजही उदासीन आहोत.
या गड किल्ल्या विषयी पुरेशी माहिती नाही .जाणून घायची इच्छा नाही.
कोण हरिश्चंद्र माहित नाही तारामती कोण माहित नाही.
रोहिदास कोण माहित नाही .
हरिश्चंद्रचा त्याग माहित नाही ,चांगदेव कोण माहित नाही.निदान त्यांच्या विषयी आदर तरी?
सर्वच ट्रेकर्स आणि हायकर्स सांगत होते 
नलीची वाट अशी ,, 
नलीची वाट तशी,,,पण  आनंदा आणि सुधीर आणि त्याचे  सहकारी
मित्र   यांच्या  मुलेच ही बिकट वाट अवघड वाट सोप्पी झाली.                               
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu65&target=ALBUM&id=5425889742984191457&authkey=Gv1sRgCIL-7tLh2rfBzQE&feat=ईमेल
आणि कोकण कडा २००५ चे काही फोटो आहेत ते ही पाहावेत
You are invited to view sunil's photo album: harishchandragad 26122005
harishchandragad 26122005
Dec 25, 2005
by sunil
If you are having problems viewing this email, copy and paste the following into your browser:
http://picasaweb.google.com/lh/sredir?uname=suprabhu65&target=ALBUM&id=5425540372362295217&authkey=Gv1sRgCMnxkLTahKKndw&feat=ईमेल
आणि यूटूब वरील  व्हिडियो पाहू शकता 
खलील लिंक वर क्लिक करा 
http://www.youtube.com/watch?v=mRmfJ9748p8

http://www.youtube.com/watch?v=ZXz_Jp98LH8

http://www.youtube.com/watch?v=IfW2dy7J2K8

Tuesday 5 January 2010

उध्हर रामेश्वर

सुधागड ता.पाली
जवळच "उध्हर" नावाचे गाव आहें.
"पाली ते उध्हर" अशी बस सेवाही आहें.
उध्हरला महादेवाची दोन जुनी देवळ आहेत.
एक नदी काठी तर दुसर डोंगरावर ,,
गावातून देवला पर्यंत  एक दीड तास लागतो .
कैमरा ,दुर्बिन घेवुन जावे कारण ,,
भोकर ,रान डुक्कर ,ससे ,माकड,कोल्हे, बिबले ,
मोर, असे अनेक पशु पक्षी पहावयास मिळतात.
या स्थानाशी अनेक दन्त कथा निगडित आहेत,,,
"बालाजी आवाजी चिटणीस,हीरोजी फरजंद
आणि इतर तिघांना हत्तीच्या पायी दिल्यावर
शंभाजी ( जसे शिवाजी संभाजी नाही शंभाजी)
महाराजांना बेचैन वाटू लागले.आपले चुकलेच असे वाटू लागले 
तेव्हा येसु बाई महाराजांना घेवुन या देवलात आल्या.
 व मुक्काम केला.
या देवलात मुक्काम केल्यास भुत बाधा नाहीशी होते अशी ख्याति आहें.
त्या प्रमाने राजांनी येथे मुक्काम केल्यावर ,
रात्रि स्वप्नात "बालाजी आवजी "आले 
त्यानी विनंती केली आम्ही थोरल्या स्वामींचे सेवक 
आपली गैर मर्जी झाली परन्तु आता गति मिळत नाही ,,
आपण निदान दिवा तरी लावा ,,
मा महाराजांनी तिघांच्या समाध्या बांधून 
दिवा बत्तिची सोय केली 
त्याना मन शान्ति मिलाली .
हेच ते उध्हर रामेश्वर ,,,
याच डोंगरावर रामायण काली "जटायु"पक्षाचे निवास स्थान होते .
सीतेला आकाश मार्गे रावण पळवून नेत असता ,
रावण व जटायु यांच्यात युध्ह होवून जटायु येथेच घायाळ झाला .
राम लक्ष्मण सीतेला शोधत शोधत येथे आले असता .
जटायुचा उध्हार केला म्हणून हे उध्हर रामेश्वर ...
आस्तिक रूषिंच्या पादुका देखिल आहेत 
त्या समोरच एक शिला आहे.त्यावर साप विंचू चावलेल्या
व्यक्तिस ठेवल्यास विष उतरते असा त्याचा महिमा आहें .
देवलातच रहायची उत्तम सोय आहें 
१०\१५ जान सहज राहतात .
उध्हर च्या वाटेवर "उन्हेर" येथे गरम पाण्याची कुंडे आहेत
पालीचा गणपती, आणि जवळच सरस गड पाहण्या सारखा आहें .



 

 

रायरेश्वर

मुंबई पुणे भोर st ने
किंवा स्वता;चे  वाहनाने भोर ,,
मग आंबावडे  म्हणून छोट गाव आहें त्या गावातून
पायी किंवा गाडीने डोंगरावर(रायरेश्वर) जाता येते
मध्ये ७\८ लहानच पण खुप छान धबधबे आहेत
निसर्ग रम्य असे ठिकाण
छत्रपति शिवाजी महारांजांच्या पदस्पर्शाने
पावन झालेले हे ठिकाण
येथेच छ्त्रपतिनी राय्रेश्वरास साक्षी ठेवून
मावल्यानच्या साथीने स्वराज्य स्थापन्याची
शपथ घेतली  हे राज्य स्वतंत्र केले
म्लेंछाना(मुसलमान) पळता भूइ थोड़ी केली
"गर शिवाजी ना होते तो,,,?
सुन्नत होती सबकी, सुन्नत होती सबकी "

भीमाशंकर,,,

आषाढ़ शुध्ह एकादशी पासून कार्तिक शुध्ह एकादशी पर्यंत
किंवा
आषाढ़ी पौर्णिमेपासून कार्तिकी पौर्णिमे पर्यंत च्या
चार महिन्यांच्या काळाला "चातुर्मास" म्हणतात.
श्रावनाताले चार सोमवार म्हणजे पर्वणीच
या काळात भगवान शिवशंकाराचे दर्शन
अहो घ्याच मी काय सांगावे?
माझा खर्या अर्थाने पहिला ट्रेक झाला तो  नकळतच
भीमाशंकर,,,
माझा मित्र मनोज कासवा याने विचारले भाऊ येणार का भीमाशंकर ला ,
माझा मित्र त्याचे वाढदिवस असेच डोंगरा वर जावून साजरे करतो ,,
येता का?
मी म्हणालो ठीक माझ्या माहिती प्रमाने त्याच्या कड़े गाड़ी होती
मला वाटल तो आपल्याला गाडीने भीमाशंकर ला घेवुन जाइल ,,,?
पण कसल काय,,, त्याने एका कर्जतच्या बस मध्ये कोंम्बल
रात्रीचा प्रवास करून दोन तास स्टेशन वर काढून ,
सकाळी सकाळी आम्ही निघालो एका सहा सीटर गाड़ी पकडली
आणि खांडस ला पोहचलो
आणि खर्या अर्थाने माझी दुर्गायनाला  सुरवात झाली
मग गणपती घाट मार्गाने
गर्द जंगलाच्या सानिध्यात ,नशीब चांगले असेल तर
शेकरू (मोठी खार) चे ही दर्शन घडते वर गेल्यावर तळ्यात आंघोळ करून
भिमशंकराचे दर्शन घ्यावे
आणि पावसाल्यात ,,,?
भिमशंकरा,,,,?या सारखी दूसरी पर्वणी नाही.
मुसळधार पाउस म्हणजे काय?
धुक्याची दुलाई ,,?
हलूवार गुदगुल्या वारा सुध्हा आपल्याला कसा करतो ?
डिम्भे धरण त्यातील पाणी ,
अरे बापरे,,,, मी तर कवी झालो?
बस हा अनुभव तुम्हीही घ्यावा हीच विनंती
ट्रेकर असाल नसाल तरी भीमाशंकर ची मजा काही औरच
हा अनुभव घेतला असेल तर ठीकच नसेल तर नक्की घ्याच.

Monday 4 January 2010

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा

.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात .
 त्यातही french beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या .
 काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)




.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :)



.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

  • सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टूम्हणतात .  
  • त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
  • शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट
  • Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट ,  
  • कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) , 
  • पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर /  
  • मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
  • शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब ,  
  • डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)
.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
  • सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
  • शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
  • शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, . . S T stand
  • शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह
.अन्य विशेष लकबी:
  • हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात ,  
  • पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात :)
  • ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत ....  
  • साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात .  
  • कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पण,,,
  •  किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :)
  • त्यातही त्यांची फारशी चूक नसते . रात्री उशिरा निघणे,  
  • वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
  • बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात :  
  • आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप  
  • इत्यादी इत्यादी ,,,,
  • यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते ,  
  • एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी,  
  • तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी ,  
  • तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :)  
  • यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते :,,
  •  यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते .
  •  एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :)
  •  सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .
.खाण्या पिण्याच्या सवयी:

  • कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
  • काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड .
  •  बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
  • पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते .
  •  बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर  
  • डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून 
  •  बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही
.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

  • खणखणित आवाजात पोवाडे गाणे
  • जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
  • बैटिंग ला जाणे :)

.यांची दैवते:

  • offcourse शिवाजी महाराज
  • रायगडचा जगदीश्वर
  • हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर . .
.यांची तिर्थस्थळे:

  • राजमाचीचा तलाव
  • बाण चा ब्लू लगून
  • नाणे घाटातील केव्ह
  • कोंकण कडा . .
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते
त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् 
(नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन  
बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

  • यांना मुली आवडत नाहीत
  • हे बाबासाहेब पुरंदरे याना खुप मानतात
  • ??

काही म्हणी आणि वाक्प्रचार :

  • खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
  • वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
  • केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
  • An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!
रॉक क्लाईम्बर वरून आठवले "रॉक