Monday, 4 January 2010

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा

.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच काहीना काही कीडे केलेले असतात .
 त्यातही french beard किंवा सैफच्या टशन स्टाइल मिश्या यांच्या फार आवडत्या .
 काही ट्रेकर्स असेही असतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत त्यांना मुली असे म्हणतात :)
.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही :).वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे

 • सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्या भाषेत पिट्टूम्हणतात .  
 • त्याला एखादा snap किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर अडकवलेली असते.
 • शुक्रवार रात्र: निघायची तयारी ...ख़राब फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट
 • Bombay Natural History Society चे कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले टी शर्ट ,  
 • कमरेला वेस्ट पाउच (ही एकखासचीज आहे ...हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) , 
 • पायात अनुभवी बनचुका ट्रेकर असल्यास स्लीपर /  
 • मध्यम अनुभवी असल्यास फ्लोटर्स / अगदीच नवखा असल्यास भारी बूट :)
 • शनिवार दुपार ते रविवार दुपार: वर उघडाबंब ,  
 • डोक्यात माकडटोपी , खाली ट्रैक पँट ...काही ट्रेकर्स उघडे नसतात त्यांना मुली असे म्हणतात :)
.सापडण्याची जागा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे
 • सोमवार ते शुक्रवार सकाळ: आपापला धंदा नोकरी व्यवसाय ...नाईलाजाने.
 • शुक्रवार रात्र: CST स्टेशनच्या मोठया घडयाळाखाली ... ही trek साठी भेटण्याची जागा.
 • शनिवार पहाट: कर्जत, मुरबाड, लोणावळा, कसारा, . . S T stand
 • शनिवार दुपार ते रविवार दुपार: कुठल्यातरी गडावरील केव्ह
.अन्य विशेष लकबी:
 • हे कुठल्या ना कुठल्या ट्रेकिंग क्लबचे मेंबर जरुर असतात ,  
 • पण ९० % वेळा दुसर्या club बरोबर ट्रेकला जातात :)
 • ट्रेकला वा शहरात कुठेही कोणताही प्लास्टीकचा कचरा टाकत नाहीत ....  
 • साधी गोळी जरी खाल्ली तरी कागद व्यवस्थीत खिश्यात ठेवतात .  
 • कोणत्याही प्रदूषणाचा यांना तिटकारा असतो . पण,,,
 •  किल्ल्यावर केव्हमध्ये कधी कधी ध्वनी + वायु प्रदुषण जरुर करतात :)
 • त्यातही त्यांची फारशी चूक नसते . रात्री उशिरा निघणे,  
 • वेळी- अवेळी खाणे, दगदग यामुळे बिचार्यान्चे पोट थोड़े फार बिघडते :)
 • बोलता बोलता मध्येच खालील शब्द फेकतात :  
 • आजोबा, अलंग, कुलंग, कोल,केव्ह, traverse , तिकोना, पिंचहोल्ड, हंप  
 • इत्यादी इत्यादी ,,,,
 • यांचे एकंदरीत काम अगदी सुबक असते ,  
 • एखाद्या सराईत गृहिणीसारखे : उदाहरणार्थ सैकमध्ये प्लास्टीकची पिशवी,  
 • तिच्यात कपडे, कपड्यांच्या घदीत प्लास्टीकची छोटी पिशवी, तिच्यात छोटी डबी ,  
 • तिच्यात कागदाची पुडी आणि तिच्यात शिट्टी :)  
 • यांचा wastepouch ही एक धमाल चीज असते :,,
 •  यात caluclator , nail कट्टर पासून सुई दोर्यापर्यंत जगातील काहीही अफलातून गोष्ट असते .
 •  एका ट्रेकरच्यापाउच मध्ये मी एकदा फॉर्म १६ A बघीतला होता आता बोला :)
 •  सैक सुद्धा अशी सुरेख भरतील की पाहत रहावं .
.खाण्या पिण्याच्या सवयी:

 • कशालाही नाही म्हणणार नाहीत :) हवे ते हक्काने मागून घेणार :)
 • काहीतरी विचित्र करून दुसरयाचे लक्ष वेधून घेण्याची वाईट खोड .
 •  बिस्किटे पाण्यात बुडवून खाणे , श्रीखंड पाव , केळ पाव खाणे इत्यादी :)
 • पाणी अतिशय जपून वापरतात . बाटलीतील पाणी ओतायची यांची खास पद्धत असते .
 •  बाटलीचे झाकण उघडून बाटलीच्या तोंडावर  
 • डाव्या हाताची तर्जनी आणि मधले बोट दाबून धरायचे आणि थोडीशी मोकळी जागा ठेवून 
 •  बाटली हळूवार कलती करायची यामुळे पाणी भस्सकन पडत नाही
.गडावर असताना यांची करमणुकीची साधने:

 • खणखणित आवाजात पोवाडे गाणे
 • जुन्या ट्रेकच्या आठवणित रमणे
 • बैटिंग ला जाणे :)

.यांची दैवते:

 • offcourse शिवाजी महाराज
 • रायगडचा जगदीश्वर
 • हरिश्चंद्र गडाचा खिरेश्वर , रतन गडचा अमृतेश्वर . .
.यांची तिर्थस्थळे:

 • राजमाचीचा तलाव
 • बाण चा ब्लू लगून
 • नाणे घाटातील केव्ह
 • कोंकण कडा . .
आणि हो ज्याप्रमाणे प्रत्येक आज्जीचं एकदातरी काशीयात्रा करण्याचे स्वप्न असते
त्याचप्रमाणे प्रत्येक ट्रेकरचे निम् 
(नेहरू इंस्टिट्यूट ऑफ़ mountaineering) ला जाऊन  
बेसिक कोर्स complete करून A ग्रेड घेउन यायचे स्वप्न असते :)

१०.ट्रेकर्स विषयी काही मोठ्ठे गैरसमज

 • यांना मुली आवडत नाहीत
 • हे बाबासाहेब पुरंदरे याना खुप मानतात
 • ??

काही म्हणी आणि वाक्प्रचार :

 • खाईन तर तुपाशी नाहीतर......... adjust करेन :)
 • वाट पाहीन पण एस टी नेच जाईन
 • केव मध्ये "आला वारा गेला वारा" तो कुणाचा सोयरा :)
 • An alive ordinary rock climber is always better than an excellent dead rock climber !!!
रॉक क्लाईम्बर वरून आठवले "रॉक

No comments: