Tuesday, 5 January 2010

उध्हर रामेश्वर

सुधागड ता.पाली
जवळच "उध्हर" नावाचे गाव आहें.
"पाली ते उध्हर" अशी बस सेवाही आहें.
उध्हरला महादेवाची दोन जुनी देवळ आहेत.
एक नदी काठी तर दुसर डोंगरावर ,,
गावातून देवला पर्यंत  एक दीड तास लागतो .
कैमरा ,दुर्बिन घेवुन जावे कारण ,,
भोकर ,रान डुक्कर ,ससे ,माकड,कोल्हे, बिबले ,
मोर, असे अनेक पशु पक्षी पहावयास मिळतात.
या स्थानाशी अनेक दन्त कथा निगडित आहेत,,,
"बालाजी आवाजी चिटणीस,हीरोजी फरजंद
आणि इतर तिघांना हत्तीच्या पायी दिल्यावर
शंभाजी ( जसे शिवाजी संभाजी नाही शंभाजी)
महाराजांना बेचैन वाटू लागले.आपले चुकलेच असे वाटू लागले 
तेव्हा येसु बाई महाराजांना घेवुन या देवलात आल्या.
 व मुक्काम केला.
या देवलात मुक्काम केल्यास भुत बाधा नाहीशी होते अशी ख्याति आहें.
त्या प्रमाने राजांनी येथे मुक्काम केल्यावर ,
रात्रि स्वप्नात "बालाजी आवजी "आले 
त्यानी विनंती केली आम्ही थोरल्या स्वामींचे सेवक 
आपली गैर मर्जी झाली परन्तु आता गति मिळत नाही ,,
आपण निदान दिवा तरी लावा ,,
मा महाराजांनी तिघांच्या समाध्या बांधून 
दिवा बत्तिची सोय केली 
त्याना मन शान्ति मिलाली .
हेच ते उध्हर रामेश्वर ,,,
याच डोंगरावर रामायण काली "जटायु"पक्षाचे निवास स्थान होते .
सीतेला आकाश मार्गे रावण पळवून नेत असता ,
रावण व जटायु यांच्यात युध्ह होवून जटायु येथेच घायाळ झाला .
राम लक्ष्मण सीतेला शोधत शोधत येथे आले असता .
जटायुचा उध्हार केला म्हणून हे उध्हर रामेश्वर ...
आस्तिक रूषिंच्या पादुका देखिल आहेत 
त्या समोरच एक शिला आहे.त्यावर साप विंचू चावलेल्या
व्यक्तिस ठेवल्यास विष उतरते असा त्याचा महिमा आहें .
देवलातच रहायची उत्तम सोय आहें 
१०\१५ जान सहज राहतात .
उध्हर च्या वाटेवर "उन्हेर" येथे गरम पाण्याची कुंडे आहेत
पालीचा गणपती, आणि जवळच सरस गड पाहण्या सारखा आहें . 

 

No comments: